Kishore Kumar Hits

Bela Shende - Runzun Runzun şarkı sözleri

Sanatçı: Bela Shende

albüm: Marathi Superhit Songs


रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं
रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं
चालले यमुनेकडे अंतर हे अधीरे
जळत असे, छळत असे, मज कसे?
कृष्ण पिसे गहिरे
रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं

झर-झर येऊन, पदरा पकडून
हसतो मज हा वारा
अडविती लाटा अवघ्या वाटा
पाऊस कोसळणारा
झर-झर येऊन, पदरा पकडून
हसतो मज हा वारा
अडविती लाटा अवघ्या वाटा
पाऊस कोसळणारा
कुणी अडवावे, कुणा अस भ्यावे
श्रीहरी सावरणारा
जायचे, पोहचायचे इतुके मज ठावे
हो जरी पडभरी, पडकरी मी त्याचे व्हावे
रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं

या तीरावर जरी अंगावर
पाश मला छळणारे
त्या तीरावर दिसते लाघव
निळसर मोहवणारे
या तीरावर जरी अंगावर
पाश मला छळणारे
त्या तीरावर दिसते लाघव
निळसर मोहवणारे
एका स्पर्शी शत जन्माची
तहान शांतवणारे
एकदा येऊ दे कानी ती मुरली
खुण ही या तीरी लाजरी माझी ही उरली
रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं
चालले यमुनेकडे अंतर हे अधीरे
जळत असे, छळत असे, मज कसे?
कृष्ण पिसे गहिरे
रुणझुण-रुणझुण नांदत पैंजण
पैल तटावर निळसर, साजन गं?
निजले गोकुळ मागे ठेवून
चेहऱ्यावरती घुंगट घेऊन गं

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar