सांज रंगात... सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? मलमली रात येऊ दे थांब ना... मलमली रात येऊ दे थांब ना, चांदण्याचा घेऊन झुला सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? ♪ नभ फुलले, ढग झुलले सागराच्या किनाऱ्यास खग भुलले नभ फुलले, ढग झुलले सागराच्या किनाऱ्यास खग भुलले स्वप्नगंधात न्हाऊन आली धरा अंग-अंगी सुखाचाच वाहे झरा आज आनंद पानां-फुलाला गोजिरे प्रीतिचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? ♪ एक गाणी मनी या फुलपंखी, हो एक गाणी मनी या फुलपंखी आळविते तुझी आज मधुवंती शब्द माझे, तुझी ही मधुगीतिका त्या स्वरांतून उमले जणू प्रीतिका पश्चिमेला नवा रंग आला त्याच रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? मलमली रात येऊ दे थांब ना... मलमली रात येऊ दे थांब ना, चांदण्याचा घेऊन झुला सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये, हा दुरावा कशाला? ♪ स्वर जुळता, मन मिळता रोमरोमी सतारीच झंकारती स्वर जुळता, मन मिळता रोमरोमी सतारीच झंकारती या सुखाने आता प्राण ओलावले पापण्यांना तुझे ओठ हे स्पर्शले मीलनाचा असा सोहळा गोजिरे प्रीतिचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला सांज रंगात रंगून जाऊ...