संधीकाळी आशा, धुंदल्या दिशा-दिशा संधीकाळी आशा, धुंदल्या दिशा-दिशा चांद येई अंबरी चांद राती रम्य या संगती, सखी प्रिया चांद राती रम्य या संगती, सखी प्रिया प्रीत होइ बावरी संधीकाळी आशा, धुंदल्या दिशा-दिशा ♪ मुग्ध तु नि मुग्ध मी अबोल गोड संभ्रनी, अबोल गोड संभ्रनी एकरूप संगमी रातरानीच्या मुळे, रातरानीच्या मुळे श्वास धुंद परिमळे फुलत प्रीतीची फुले, फुलत प्रीतीची फुले प्रणय गीत हे असे कानी ऐकू येत असे गीत शब्द ना जरी संधीकाळी आशा, धुंदल्या दिशा-दिशा ♪ सांज रंगी रंगुनी नकळताच दंगुनी, नकळताच दंगुनी हृदय तार छेडूनी युगुल गीत गाऊनी, युगुल गीत गाऊनी एकरूप होऊनी देऊ प्रीत दावूनी, देऊ प्रीत दावूनी प्रणय चित्र हे दिसे, रंग संगती ठसे उंच-लहान असे जरी संधीकाळी आशा, धुंदल्या दिशा-दिशा धुंदल्या दिशा-दिशा