असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या...
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
♪
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले
तृणात फूलपाखरू...
तृणात फूलपाखरू तसे बसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
♪
स्वये मनात जागते, न सूर-ताल मागते
स्वये मनात जागते, न सूर-ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
♪
कुणास काय ठाऊके कसे, कुठे उद्या असू
कुणास काय ठाऊके कसे, कुठे उद्या असू
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या...
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
तरी असेल गीत हे, तरी असेल गीत हे
Поcмотреть все песни артиста