Kishore Kumar Hits

Arun Date - Paaus Kadhicha Padto şarkı sözleri

Sanatçı: Arun Date

albüm: Aakashganga (Bhav Geet)


पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सूराने
पाऊस कधीचा पडतो

डोळ्यांत उतरते पाणी
पाण्यावर डोळे फिरती, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उडला पारा, दुःखाचा उडला पारा
या नितळ उतरणी वरती
पाऊस कधीचा पडतो

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी, ताऱ्यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला
पाऊस असा कोसळला
पाऊस कधीचा पडतो

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, लाटांचा आज पहारा
आज पहारा, आज पहारा
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सूराने
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar