सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती जय देव जय देव रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव लंबोदर पितांबर फनी वरवंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती जय देव जय देव