ताक घुसळ-घुसळ, माय-बाई दाणे दळ
तोंडावर ठेव हसू, लपवून सारे वळ
ताक घुसळ-घुसळ, रडू नको घळ-घळ
थेंब-थेंब पाणी सांड, सांग डोळ्यात कुसळ
ताक घुसळ-घुसळ, दर मास भळ-भळ
तुझं नशिब-नशिब, चार दिसांची मळ-मळ
ताक घुसळ-घुसळ, येवो लोणीयाचे बळ
वर आनंदाचा झरा, आत सारी खळ-बळ
ताक घुसळ-घुसळ, साऱ्या घराला विसळ
तुझ्या मायेनं-मायेनं, दिव्या सारखी उजळ
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri