तरुन जो जाइल सिंधु महान असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् तरुन जो जाइल सिंधु महान तरुन जो जाइल सिंधु महान असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं झेपेसरशी समुद्र लंघुनि भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं झेपेसरशी समुद्र लंघुनि गरुड उभारी पंखां गगनीं गरुड उभारी पंखां गगनीं गरुडाहुन बलवान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् अंजनिचा हा बलाढ्य आत्मज हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज अंजनिचा हा बलाढ्य आत्मज हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज निजशक्तीनें ताडिल दिग्गज निजशक्तीनें ताडिल दिग्गज बलशाली धीमान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् त्रिशत योजनें नभीं उडाला समजुनिया फळ रविबिंबाला समजुनिया फळ रविबिंबाला धरुं गेला भास्वान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् बाल-वीर हा रवितें धरितां भरें कापरें तीन्ही जगतां बाल-वीर हा रवितें धरितां भरें कापरें तीन्ही जगतां या इवल्याशा बाळाकरितां या इवल्याशा बाळाकरितां वज्र धरी मघवान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् जरा दुखापत होय हनुतें कोप अनावर येइ वायुतें कोप अनावर येइ वायुतें थांबे तो गतिमान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् पवन थांबता थांबे जीवन देव वायुचें करिती सांत्वन पवन थांबता थांबे जीवन देव वायुचें करिती सांत्वन पुत्रातें वर त्याच्या देउन पुत्रातें वर त्याच्या देउन गौरविती भगवान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् शस्त्र न छेदिल या समरांगणिं विष्णुवरानें इच्छामरणी शस्त्र न छेदिल या समरांगणिं विष्णुवरानें इच्छामरणी ज्याच्या तेजें दिपला दिनमणी ज्याच्या तेजें दिपला दिनमणी चिरतर आयुष्मान् असा हा एकच श्रीहनुमान् असा हा एकच श्रीहनुमान् सामान्य न तूं या कपिजनसा उचल एकदां पद वामनसा घे विजयी उड्डाण