युगे २८ विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गां चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव, जय देव... (जय देव, जय देव, जय पांडुरंगा) (रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा) (जय देव, जय देव...) तुळशीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे, पितांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव, जय देव... (जय देव, जय देव, जय पांडुरंगा) (रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा) (जय देव, जय देव...) आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माजी स्नाने जे करिती दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळीती जय देव, जय देव... (जय देव, जय देव, जय पांडुरंगा) (रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा) (जय देव, जय देव...)