महाराष्ट्र हृदयात आमच्या, कंठात मायमराठी
अभिमान-स्वाभिमान मातीच्या कणकणाशी
नाट्यवेड आम्ही जपतो कुसुमाग्रज हृदयात
स्वप्न दादासाहेबांचे नित्य असे डोळ्यात
नऊवारी नथ चंद्रकोर लावण्याचा झरा
हिरकणी जिजाऊ आमच्या जगण्याचा धडा
धगधगत्या स्वाभिमानाचे भाग्य कोरले ललाटी
महाराष्ट्र ह्रद्यात आमच्या, कंठात मायमराठी
अभिमान-स्वाभिमान मातीच्या कणकणाशी
♪
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो भाग्य हे माझे
छत्रपती आराध्यदैवत (छत्रपती आराध्यदैवत)
छत्रपती आराध्यदैवत भूमीला साजे
मनातुन आम्ही रोज चालतो पंढरीची वारी
पसायदान आम्ही रोज मागतो, जपतो "ज्ञानेश्वरी"
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri