(गणपती बाप्पा मोरया) त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं चला-चला करूया नमन गणरायाला गं त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभकार्याला गं ♪ अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं हो, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं ♪ या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली गं रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली गं (अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं) (चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं) हो, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं ♪ अशा चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं अशा चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं अशी ३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं (अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं) (चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं) हो, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं ♪ मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गं मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गं अशी चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं हो, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं