प्रभू मी तुझ्या करातील वीणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा आनंदाचे छेड सूर वा आनंदाचे छेड सूर वा अश्रुजलाची करुणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा ♪ सात स्वरांच्या जोडुनी तारा तूच घडविले या आकारा तुझ्याच केवळ करस्पर्शाने फुलवी तूच तराणा तुझ्या करातील वीणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा ♪ तुझ्या मनातील दिव्य सुरावट कुणी न जाणतो नशिबाचा पट तव चरणाशी लीन होतसे रंक असो वा राणा तुझ्या करातील वीणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा ♪ घे मजलाही तुझ्या पदासी जन्म घालविन होऊन दासी तुझ्याच भजनी समरसताना मुक्ति मिळो या प्राणा तुझ्या करातील वीणा प्रभू मी तुझ्या करातील वीणा