सख्या रे, सख्या रे, सख्या रे, सख्या रे ओलांडला उंबरठा, ओलांडली वेस कापुनिया दोर सारे चालला प्रवास कटला पतंग तैसे आयुष्याचे व्हावे वारा नेई, तेथे जाई खात हेलकावे प्रेमासाठी भरभट असतेच का रे? सख्या रे, सख्या रे, सख्या रे, सख्या रे ♪ अंधारल्या दाही दिशा, मनात का हूर? अनोळखी वाटा साऱ्या घर राही दूर कोठूनिया आलो आणि चाललोत कोठे तळहाती घेऊनिया शून्य एक मोठे हो, सुखाची ती वरचढ सापडेल का रे? सख्या रे, सख्या रे ♪ काट्याच्या ह्या वाटेवरी तुझ्या सोबतीने चालीन मी जन्मभर हसत मुखाने हो, दुःखाची करीन ढाल, आसवांचे मोती जगायाला हवी फक्त तुझी एक मीठी हो, तुझ्यासाठी झेलीन मी जळते निखारे सख्या रे, सख्या रे