श्रीरंगा हो, ध्यास जीवाला दिन-रात्री लागला दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? श्रीरंगा हो, ध्यास जीवाला दिन-रात्री लागला दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? ♪ गजेंद्र मोक्षा धावूनी गेला पांचालीचे बंधू झाला गजेंद्र मोक्षा धावूनी गेला पांचालीचे बंधू झाला आळविता पण मी प्रेमाने सांगा का रुसला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? ♪ विदुरा घरच्या कण्या भक्षिल्या नाथा सदनी कावडी आणिल्या विदुरा घरच्या कण्या भक्षिल्या नाथा सदनी कावडी आणिल्या भक्त सख्या का हाक ऐकता? माघारी वळला दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? ♪ जणीसंगे कष्टी झाला सावता माळ्याचा मळा फुलविला जणीसंगे कष्टी झाला सावता माळ्याचा मळा फुलविला जणी जनार्दन पदवी तुमची आज कशी विसरला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला? दयाळा, कुठे तुम्ही गुंतला?