ही नागमोडी वाट वळणाची ही नागमोडी वाट वळणाची तू छेडलेली तार काळजाची कोवळे गुपित ठेविले जपून हळूच झाले मनात रुजून गाणे या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी ♪ भेट कुठे झाली ना कळे नजर कुठे जडली ना कळे आठवते मज बस इतुके गुलमोहर हे हुरहुरले ♪ हो, का लाजते हे? का जागते हे? का लाजते हे? का जागते हे? चांदणे हळूच स्पर्शात फुलून ह्रदयी त्याचे झाले भिजून गाणे या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी ♪ रंग नवे आले भरूनी स्वप्न जणू उतरे नयनी प्रेम-प्रेम जे म्हणती ते जीवनात आले सजुनी ♪ ते पाहणे गे, ते न्हाहने गे ते पाहणे गे, ते न्हाहने गे केस रेशमी मोकळे सोडून गालाच्या खळीत राहिले गुंतून गाणे या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी