रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो श्रावणओल्या आठवणींचा श्रावणओल्या आठवणींचा सुगंध अजुनी दरवळतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो ♪ पाऊस ओला, स्पर्श रेशमी अंग-अंगही भिजलेले पाऊस ओला, स्पर्श रेशमी अंग-अंगही भिजलेले थरथरणाऱ्या मिठीत कोणी हळूच डोळे मिटलेले त्या स्पर्शाचा नाद बिलोरी त्या स्पर्शाचा नाद बिलोरी स्पंदनातुनी किणकिणतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो ♪ हिंदोळ्यावर हिरव्या राणी श्रावणगाणी गाताना हिंदोळ्यावर हिरव्या राणी श्रावणगाणी गाताना थेंब टपोरे टिपण्यासाठी दोन ओंजळी झुलताना मोहरलेला पाऊसवारा मोहरलेला पाऊसवारा अजून रानी भिरभिरतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो ♪ ओसरल्या त्या पाऊसधारा क्षण सारे जरी ओसरले ओसरल्या त्या पाऊसधारा क्षण सारे जरी ओसरले झिमझिमणाऱ्या पावसात ह्या पुन्हा पिसारे उलगडले पानोपानी ऋतू कालचा पानोपानी ऋतू कालचा अजून गाणे गुणगुणतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो रोज कसा पाऊस गुलाबी मनात माझ्या रिमझिमतो रिमझिमतो, रिमझिमतो