खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली-निघाली सारी विष्णुमय झाली माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली-निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या वरा तरी जीव लागी तुझ्या पायरी ऱ्हावं दारी उभा माझ्या देतो वीट पायी तुझ्या सेवा करीन युगे-युगे, माऊली हरी मुखी नामघोष, विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) देह दंग सावळ्याच्या अंगणी (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी ♪ कळो तूच कर्म, तुझे नाम धर्म (रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी) (रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी) कळो तूच कर्म, तुझे नाम धर्म वारकरी पंथ, पांडुरंग वारकरी पंथ, पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) देह दंग सावळ्याच्या अंगणी (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी ♪ तळहाती कान्हा सावळाच गं भासे मज कान्हा विठूसम गं तळहाती कान्हा सावळाच गं भासे मज कान्हा विठूसम गं एक ओढ सतत मनी, व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी, व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्यासोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले, भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण, कारण, तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूत म्हणून त्यांचा अट्टाहास पूर्ण झाला Facebook दिंडी, facebook दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी