Kishore Kumar Hits

Vaishali Samant - Arth Majhya Bolanyacha şarkı sözleri

Sanatçı: Vaishali Samant

albüm: Hi Sanj Sukhane


अर्थ माझ्या बोलण्याचा जर तुला कळला असावा
लाजली असशील ही अन तोलही ढळला असावा
आठवण येते तिची तेव्हा दिवस माझा उगवतो
भेटूनी गेल्यावरी ती दिवसही ढळला असावा
हे असे तेव्हा तुझ्याशी बोललो होतो कुठे मी
शब्द जो ओठात होता तो जरा चळला असावा
एरवी येणार कुठुनी या अशा झुळका सुगंधी
हा तिचा आहे दुपट्टा तोच सळसळला असावा

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar