ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते... स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा आभाळ मनाचे गुणगुणते आभाळ मनाचे गुणगुणते, जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची आभाळ मनाचे गुणगुणते, जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची जो झंकारे माझ्यासाठी तो सुर जडे देहास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला मी इतकी खुलले की अंती केवळ उरला मधुमास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा घेऊन उशाला हात तुझा... घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले तृप्तीत अश्या या विरताना घेईन पुन्हा मी ध्यास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते... स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा