सावळे लोभस रूप तुझे हे कशी भूल घाली मना ♪ सावळे लोभस रूप तुझे हे कशी भूल घाली मना दाटूनी आले घन प्रीतीचे बरसशील का या वना? मी तुझी राधा, मी तुझी राधा तू माझा कृष्ण सखा, तू माझा कृष्ण सखा ♪ मुरली मनोहर, मोरपंखी तू ऐकू दे बासरीचे सूर मला मुरली मनोहर, मोरपंखी तू ऐकू दे बासरीचे सूर मला डोळे मिटूनी अनुभवावे जन्मोजन्मी तुला डोळे मिटूनी अनुभवावे जन्मोजन्मी तुला मी तुझी राधा, मी तुझी राधा तू माझा कृष्ण सखा, तू माझा कृष्ण सखा ♪ तुझा अन माझा देह वेगळा जीवपरी असे एक आपुला तुझा अन माझा देह वेगळा जीवपरी असे एक आपुला युगा-युगांचे नाते आगळे, मी राधा, तू कृष्ण सावळा युगा-युगांचे नाते आगळे, मी राधा, तू कृष्ण सावळा मी तुझी राधा, मी तुझी राधा तू माझा कृष्ण सखा, तू माझा कृष्ण सखा सावळे लोभस रूप तुझे हे कशी भूल घाली मना दाटूनी आले घन प्रीतीचे बरसशील का या वना? मी तुझी राधा, मी तुझी राधा Hmm, कृष्ण सखा