Kishore Kumar Hits

Abhanga Repost - Kashala Kashi Jato - Vaari şarkı sözleri

Sanatçı: Abhanga Repost

albüm: Kashala Kashi Jato (Vaari)


संत सांगती ते ऐकत नाही...
संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो
संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो
कीर्तनी मान डोलतो परी
कीर्तनी मान डोलतो परी
कीर्तनी मान डोलतो परी
कोंबडी-बकरी खातो
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो?
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो?

वडील जनांचे श्राद्ध कराया
वडील जनांचे श्राद्ध कराया
गंगे माझी पिंड देतो
वडील जनांचे श्राद्ध कराया
गंगे माझी पिंड देतो
खोटा व्यापारा जरा ना सोडी
खोटा व्यापारा जरा ना सोडी
खोटा व्यापारा जरा ना सोडी
तो देव कसा पावतो?
प्रत्येकजण आयुष्यभर देव-धर्म करतो
पण आपण किती वेळा खरेपणानं वागतो?
आयुष्यभर खोटा व्यापर करतो आणि तसेच मरतो
आणि म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो?
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो?

झालेले मागे पाप धुवाया
देवा पुढे नवस देतो
झालेले मागे पाप धुवाया
देवा पुढे नवस देतो
तुकड्या म्हणे, "सत्य आचरणावाचोनि"
तुकड्या म्हणे, "सत्य आचरणावाचोनि"
तुकड्या म्हणे, "सत्य आचरणावाचोनि"
"कोणीच ना मुक्त होतो"
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो? (कशाला पंढरी जातो?)
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो? (कशाला पंढरी जातो?)
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो? (कशाला पंढरी जातो?)
कशाला काशी जातो रं बाबा?
कशाला पंढरी जातो? (कशाला पंढरी जातो?)
कशाला काशी जातो? कशाला पंढरी जातो?

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar