आरती ब्रह्मणस्पति, नेती आणी विश्वाची गती
शांति योग प्राप्ती कारणे सकळं ब्रह्म तुझं ध्याती
आरती ब्रह्मणस्पति...
समुदाय गणवाचक अनंत गणांचा स्वामी
नाम शोभे गणपती भिन्न-भिन्न नाही सरवी
सगुणी रूप धरीले तेथे ॐकार तुम्हीं
स्वानंदी अखंड वास सकळं सुखाचे ब्रम्ही
आरती ब्रह्मणस्पति...
आरती ब्रह्मणस्पति, नेती आणी विश्वाची गती
शांति योग प्राप्ती कारणे सकळं ब्रह्म तुझं ध्याती
आरती ब्रह्मणस्पति...
सकळांचा आई-बाप याहुनी जेष्टराज
मुक्ति-मुक्ति आदिपाद सगुण सिद्धिचे साज
आत्मज्ञान, बुद्धिमान त्याचा पति तू विराज
जयालागी सकळं पूजिती ज्ञान आणी पदांचे काज
आरती ब्रह्मणस्पति, नेती आणी विश्वाची गती
शांति योग प्राप्ती कारणे सकळं ब्रह्म तुझं ध्याती
आरती ब्रह्मणस्पति...
सकळचित्ती वास तुझा चिंतामणी याहुण
सकळांची सत्ता तुचि विघ्नराज नाम जाण
ब्रह्म आम्ही ऐसे गहरवे पद भ्रष्ट करी विघ्न
दुजा नाही तुझा सरी, गणेश योगी करी वर्णन
आरती ब्रह्मणस्पति, नेती आणी विश्वाची गती
शांति योग प्राप्ती कारणे सकळं ब्रह्म तुझं ध्याती
आरती ब्रह्मणस्पति...
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri