हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
सद्गुरू साक्षात पाहुनी श्रुष्टी ही आनंदली
...श्रुष्टी ही आनंदली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
♪
रूप साईंचे पाहुनी विसरलो मी देहभान
रूप साईंचे पाहुनी विसरलो मी देहभान
कैवल्याचा पुतळा थोर, ममतेची जणू आहे सकाळ
साधना सफल झाली, साधना सफल झाली
पाहिली डोळ्यांन माऊली, पाहिली डोळ्यांन माऊली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
♪
घेता दर्शन साईंचे पुरी होई मनोकामना
साईनाथांच्या पाई ठेवावी सदभावना
भार शिरी घेतो साई, भार शिरी घेतो साई
देतो सुखाची सावली, देतो सुखाची सावली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
♪
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वेदना त्या दरबारी
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वेदना त्या दरबारी
साऱ्या धर्माचे ते माहेर, साई माझे अवतारी
बाळ श्रावण तो म्हणे, बाळ श्रावण तो म्हणे
"सकलांचा साई हो वाली, सकलांचा साई हो वाली"
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
सद्गुरू साक्षात पाहुनी श्रुष्टी ही आनंदली
...श्रुष्टी ही आनंदली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली
(हर्षले हे सारे अंबर, धरणी माता हर्षली)
Поcмотреть все песни артиста