चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
डोळे भरून पाहू रुख्मिनी-पांडुरंग
डोळे भरून पाहू रुख्मिनी-पांडुरंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
♪
येता त्या पुण्यवान नगरीला
पांडुरंगाच्या पंढरपुराला
करुनी स्नान चंद्रभागेत
करूया शुद्ध आपल्या देहाला
विठ्ठलाच्या भजनी बघ होऊया गं दंग
विठ्ठलाच्या भजनी बघ होऊया गं दंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
♪
जाता त्या मंदिराच्या वाटेला
पाहूया चोखोबा समाधीला
चढुनी नामदेवाची पायरी
जाऊया देवाच्या दर्शनाला
उभा विटेवरती दिसेल तो श्रीरंग
उभा विटेवरती दिसेल तो श्रीरंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
♪
भजुया मनोभावे विठुराया
कर जोडुनी पडूया पाया
म्हणूया "जय हरी" विठ्ठल
वाहूया चरणी आपली काया
वाहताच काया फुलेल सर्व अंग
वाहताच काया फुलेल सर्व अंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
♪
देवाच्या चरणी माथा झुकविता
मिटेल सारी मनाची चिंता
शरण जाऊ त्या अनंताला
सर्वावरी त्याची आहे सत्ता
इच्छा तंव मनाची, सखे, त्याला सांग
इच्छा तंव मनाची, सखे, त्याला सांग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
डोळे भरून पाहू रुख्मिनी-पांडुरंग
डोळे भरून पाहू रुख्मिनी-पांडुरंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
चल गं सखे पंढरीला, चल माझ्यासंग
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri