येई हो विठ्ठले माझे माऊलीये येई हो विठ्ठले माझे माऊलीये विढळावरी कर... विढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊलीये आलीया गेलीया हाती धाडी निरोपं आलीया गेलीया हाती धाडी निरोपं पंढरपूरी आहे... पंढरपूरी आहे माझा माय-बाप माझा माय-बाप येई हो विठ्ठले माझे माऊलीये पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला? गरुडावर बैसुनी... गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला येई हो विठ्ठले माझे माऊलीये विठोबाचे राज्य आम्हा दसरा, दिपवाळी विठोबाचे राज्य आम्हा दसरा, दिपवाळी विष्णू दास नामा... विष्णू दास नामा जीवे-भावे ओवाळी जीवे-भावे ओवाळी येई हो विठ्ठले माझे माऊलीये येई हो विठ्ठले माझे माऊलीये विढळावरी कर... विढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊलीये येई हो विठ्ठले माझे माऊलीये