लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषे कंठ काळा, त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझूळा
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय श्रीशंकरा)
(हो, स्वामी शंकरा)
(आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा)
(जय देव, जय देव...)
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगी पार्वती, सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय श्रीशंकरा)
(हो, स्वामी शंकरा)
(आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा)
(जय देव, जय देव...)
देवी दैत्यी सागरमंथन पै केले
त्यामाजीं अवचित हलहल जे उठले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
"नीलकंठ" नाम प्रसिद्ध झाले
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय श्रीशंकरा)
(हो, स्वामी शंकरा)
(आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा)
(जय देव, जय देव...)
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटीळक रामदासा अंतरी
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय श्रीशंकरा)
(हो, स्वामी शंकरा)
(आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा)
(जय देव, जय देव...)
Поcмотреть все песни артиста