आरती साईं बाबा, सौख्य दातार जीवा
चरण रजतळीं द्यावा दासा विसांवा
(भक्ता विसांवा, आरती साईं बाबा)
जाळूनिया अनंग सस्वरूपी राहे दंग
मुमुक्षुजना दावी निज डोळा श्रीरंग
(डोळा श्रीरंग, आरती साईं बाबा)
जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव
दावीसी दयाधना ऐसी तुझी ही माव
(तुझी ही माव, आरती साईं बाबा)
तुमचे नाम ध्याता, हरे संसृती व्यथा
आगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा
(दाविसी अनाथा, आरती साईं बाबा)
कलियुगी अवतार सगुणब्रह्म साचार
अवतीर्ण झालासी, स्वामी दत्त दिगंबर
(दत्त दिगंबर, आरती साईं बाबा)
आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया, भवभय निवारी
(भय निवारी, आरती साईं बाबा)
माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता, तुम्हा देवाधी देवा
(देवाधी देवा, आरती साईं बाबा)
इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक
(आपुली भाक, आरती साईं बाबा)
(सौख्यदातार जीवा चरण रजतळीं)
(द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा)
(आरती साईं बाबा)
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri