Kishore Kumar Hits

Varsha Barai - Majhe mala kalalech na şarkı sözleri

Sanatçı: Varsha Barai

albüm: Jhimmad


माझे मला कळलेच ना का जीव हा वेडावला
स्वप्नातही दिसतोस तु की वाटतो आभास हा
माझे मला कळलेच ना का जीव हा वेडावला
स्वप्नातही दिसतोस तु की वाटतो आभास हा
माळून घे हे श्वास तु, जाणून घे ह्या स्पंदना
भासातले विरले धुके, सहवास हा भुलवी मना

खळ्या लाजणाऱ्या गालास पडता
कळ्या मोगऱ्याच्या उमलून आल्या
खळ्या लाजणाऱ्या गालास पडता
कळ्या मोगऱ्याच्या उमलून आल्या
मुका शब्द व्हावा, पापण्या झुकाव्या
नवा अर्थ यावा शहाऱ्यास ओल्या
दोघात न अंतर उरले, ओठांतून अमृत झरले
होऊन पाखरू भिरभिरण्याचा छंद लागला खुळा
माझे मला कळलेच ना का जीव हा वेडावला
स्वप्नातही दिसतोस तु की वाटतो आभास हा
हो, माळून घे हे श्वास तु, जाणून घे ह्या स्पंदना
भासातले विरले धुके, सहवास हा भुलवी मना

तुला मी, मला तु बिलगून जाता
बहरास आला ऋतू यौवनाचा
Hmm, तुला मी, मला तु बिलगून जाता
बहरास आला ऋतू यौवनाचा
नशा पावसाची दिशा धुंद झाल्या
बरसून जावा घन श्रावणाचा
आभाळ सावळे झाले वाऱ्यावर अलगुज बोले
चल ओंजळ-ओंजळ झेलून घेऊ थेंब हा टपोरा
माझे मला कळलेच ना का जीव हा वेडावला
स्वप्नातही दिसतोस तु की वाटतो आभास हा
हो, माळून घे हे श्वास तु, जाणून घे ह्या स्पंदना
भासातले विरले धुके, सहवास हा भुलवी मना

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar