Kishore Kumar Hits

Varsha Barai - Indradhanuchya jhulya bhovati şarkı sözleri

Sanatçı: Varsha Barai

albüm: Jhimmad

इंद्रधनूच्या झुल्याभवती चिंब मेघ भिजलेले

इंद्रधनूच्या झुल्याभवती चिंब मेघ भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले

शुभ्र सुगंधी प्राजक्ताचे जर्द केशरी देठ
शुभ्र सुगंधी प्राजक्ताचे जर्द केशरी देठ
गार नाचऱ्या झुळुकी सरशी...
गार नाचऱ्या झुळुकी सरशी हिरवळीत भिजलेले
इंद्रधनूच्या झुल्याभवती चिंब मेघ भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले

मऊगार स्पर्शातून अवघ्या थरथर होते देही
मऊगार स्पर्शातून अवघ्या थरथर होते देही
दरवळतो मातीचा परिमळ...
दरवळतो मातीचा परिमळ मन माझे भिजलेले
इंद्रधनूच्या झुल्याभवती चिंब मेघ भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले

भाव दाटल्या चिंब स्वरातून प्राजक्ताच्या खाली
भाव दाटल्या चिंब स्वरातून प्राजक्ताच्या खाली
पहिले-वहिले मी ही लिहिले...
पहिले-वहिले मी ही लिहिले प्रेमपत्र भिजलेले
इंद्रधनूच्या झुल्याभवती चिंब मेघ भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले
अबोल हळवे सूर कोवळे बासरीत भिजलेले

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar