Kishore Kumar Hits

Varsha Barai - Halkech chandanyala şarkı sözleri

Sanatçı: Varsha Barai

albüm: Jhimmad


हलकेच चांदण्याला हृदयात जाग आली
घन अमृतात धरणी बहरून चिंब झाली
अधरावरी पुन्हा ते उजळून नाव आले
स्मरणात झाकलेले उमलून गाव आले
मधुमास तोच आठवतो धुंद या क्षणा
भेटशील ना? भेटशील ना?

शब्दही त्याचे, सुरही त्याचे गीत ओळखीचे
स्पर्श जीवाचे, गंध मनाचे फूल अंतरीचे
स्वप्नात दिसे तोच-तोच चेहरा पुन्हा
भेटशील ना? भेटशील ना?

जाईजुई बोले काही, गुज मनीचे बोले जणू
जपलेल्या ह्या मोरपिसांचे उतरून आले इंद्रधनू
चल ये रे आज रंगूवूया राज तो पुन्हा
भेटशील ना? भेटशील ना?

वेड्या नभाचे झोके जीवाचे, सौख्य चांदण्यांचे
आले कुठूनी दूर-दुरुनी नाद भावनांचे
तुझियाविना ह्या एकांती सूर हा सुना
भेटशील ना? भेटशील ना?
भेटशील ना? भेटशील ना?

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar