धुंदी चा क्षण हा ओला, प्रीतीने मंतरलेला
सांगे हा तुला, ऐक ना
बरसू दे ना मना ला, कळू दे ना रे जगा ला
साऱ्या चिंब ओल्या भावना
विसरू माझे-तुझे अन् जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला, "थांब ना, हां, थांब ना"
♪
ना बोलता ही कळाले ओठातले गुज सारे
वाचुन घे या क्षणी तू नजरेत संवाद सारे
हळवे से मोहरलेले सतरंगी मन हे माझे
पुकारे तुला, ऐक ना
बरसू दे ना मना ला, कळू दे ना रे जगा ला
साऱ्या चिंब ओल्या भावना
विसरू माझे-तुझे अन् जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला, "थांब ना, हां, थांब ना"
♪
तू सांग माझे मला का, नादावणे हे कळे ना
ऐकू मला येई सारे, जे-जे तुला बोलवेना
डोळ्यांची कळली भाषा, जुळलेले सुर हे आता
छेळू चल पुन्हा, ये जरा
बरसू दे ना मना ला, कळू दे ना रे जगा ला
साऱ्या चिंब ओल्या भावना
विसरू माझे-तुझे अन् जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला, "थांब ना, हां, थांब ना"
♪
हां, थांब ना
Поcмотреть все песни артиста