श्वासातुन तू दरवळता मन हलकेच उमलते रे तुझ्या मनाच्या भावताली मी अलवार तरळते रे झूळुक हवेची हलकी शी तू, मी वाळु सम उड़ते रे हरवुन जाते तुझ्या मधे अन तुझीच केवळ उरते रे ♪ माझी ही वेडी नज़र तुझ्याच साठी झूरे सांगू कसे जग हे तूझ्या विना ना उरे? तुझ्या मधे अशी मी विरून चालले आहे तुला काही खबर मी विसरून तन-मन माझे तुज भवती भिरभिरते रे हरवून जाते तुझ्या मधे अन तुझीच केवळ उरते रे ♪ होता तुझी मी ज़रा नादावली पावले रोखू कसे सांग तू मन आज भाम्बावले? माझे हसू ही मी तुझ्यात शोधते माझ्या सूखा चा तू बहर क्षणभर नाही तू दिसला नकळत मन हूर हुर ते रे हरवून जाते तुझ्या मधे अन तुझीच केवळ उरते रे