राजा ♪ थांब गं सजनी, थांब गं जरा थांब गं सजनी, थांब गं जरा ऐन दुपारी तू अशी लगबग कुठे जाशी? लाख जणांच्या चुकवीत नजरा ऐक ना सजना, ऐक ना जरा ऐक ना सजना, ऐक ना जरा अशी भर वाटेवरी छेडाछेड नाही बरी लाख जणांच्या डसतील नजरा थांब गं सजनी, थांब गं जरा ऐक ना सजना, ऐक ना जरा ♪ सारखे मागे-पुढे सांग बघशी का? सारखे मागे-पुढे सांग बघशी का? अशी कावरी-बावरी मध्येच उगाच तू होशी का? भासते मागे-मागे माझ्या येते कुणी भासते मागे-मागे माझ्या येते कुणी उरी भीती दाटे, अंगा कंप सुटे, डोळा येते पाणी मला घराची ही चाळ, एकीकडे त्याची ओढ कासावीस हो जीव बिचारा थांब गं सजनी, थांब गं जरा थांब गं सजनी, थांब गं जरा ऐन दुपारी तू अशी लगबग कोठे जाशी? लाख जणांच्या चुकवीत नजरा ऐक ना सजना, ऐक ना जरा थांब गं सजनी, थांब गं जरा, थांबना ♪ सांग गं तुझ्या जिवा वेड लावी कोण? सांग गं तुझ्या जिवा वेड लावी कोण? सांग जागेपणी तुला दिसे कोण? स्वप्नी भेटे कोण? पुरती झाले त्याची, मी ही माझी नाही पुरती झाले त्याची, मी ही माझी नाही सारे समजून-उमजून नामा निराळा तो कसा राही? सारे कळी माझ्या मना, तोल परी सावरेना मी ही उतावीळ, तो ही अथीरा थांब गं सजनी, थांब गं जरा थांब गं सजनी, थांब गं जरा ऐन दुपारी तू अशी लगबग कुठे जाशी? लाख जणांच्या चुकवीत नजरा ऐक ना सजना, ऐक ना जरा ऐक ना सजना, ऐक ना जरा अशी भर वाटेवरी छेडाछेड नाही बरी लाख जणांच्या डसतील नजरा थांब गं सजनी, थांब गं जरा ऐक ना सजना, ऐक ना जरा, हा