सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी जय देव, जय देव जय श्री हनुमंता, ओ, स्वामी हनुमंता तुमचे नि प्रसादे न भी कृतांता जय देव, जय देव दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानीला खेद कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बोध जय देव, जय देव जय श्री हनुमंता, ओ, स्वामी हनुमंता तुमचे नि प्रसादे न भी कृतांता जय देव, जय देव कोटीच्या कोटी गगनीं उडाला अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनि आला आला गेला आला कामा बहुतांला वानर कटका चुटका लावुनियां गेलां जय देव, जय देव जय श्री बलभीमा, ओ, सवामी बलभीमा आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा जय देव, जय देव उत्कटबळ तें तुंबळ खळबळली सेना चळवळ करितां त्यासी तुळणा दीसेना उदंड किर्ती तेथें मन हें बैसेना दास म्हणे न कळे मोठा कीं साना जय देव, जय देव जय श्री बलभीमा, ओ, सवामी बलभीमा आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा जय देव, जय देव